
नांदगाव ( वार्ताहार ) : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ,संचालित व्ही. जे. हायस्कूल, नांदगाव येथील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक तथा कवी मा. विलास यादवराव काकळीज यांचा सेवापूर्तीव पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला “
गौरव सोहळा व पुस्तक प्रकाशन समारंभ शनिवार,३१ ऑक्टोबर २६ रोजी विद्यालयाच्या गुरुदक्षिणा सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष माननीय . संजीव धामणे. प्रमुख अतिथी संस्थेचे सचिव मा . राहुल दत्तात्रय मुळे, संस्थेचे सहकोषाध्यक्ष मा . हेमंत देशपांडे आणि कवी व लेखक मा . तुकाराम धांडे उपस्थित होते. यावेळी सत्कारमूर्ती . विलास काकळीज व सौ. सुनीता काकळीज, मुख्याध्यापक ल. ना. ठाकरे, उपमुख्यापक. .श्रावण सूर्यवंशी, शिक्षक प्रतिनिधी . सुरेश नवसारे संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात व सरस्वती पूजन बासरी वादनातून गणेश वंदना सादर केली. यासाठी मार्गदर्शन श्री.डंबाळे सर यांचे लाभले
स्वागत गीतानंतर मुख्याध्यापक ल. ना. ठाकरे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका विशद केली. तसेच विलास काकळीज सर यांच्या २९ वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेत त्यांच्या कार्याचा गौरव केला. मान्यवरांचा परिचय . गुलाब पाटील यांनी करून दिला.
विलास काकळीज सर यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात विज्ञान विषयाचे अध्यापन करताना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासू वृत्ती आणि ज्ञानाची आवड निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. अध्यापनातील निष्ठा, शिस्त, कर्तव्यतत्परता आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता यांमुळे त्यांनी विद्यार्थी व सहकाऱ्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले.या सोहळ्याचे औचित्य साधून विलास काकळीज यांच्या ‘श्वासांच्या पानांवरील अक्षरे’ आणि ‘मातीच्या कुशीतली स्वप्ने’ या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यांच्या साहित्यिक प्रवासाचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या लेखनाचे कौतुक केले.
यावेळी विलास काकळीज यांनी ना शि प्र मंडळास ५१ हजार रुपयांची देणगी जाहीर करून संस्थेचे सचिव. राहुल मुळे यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला. आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा त्यांचा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वांनी विशेष कौतुक केले.
पुस्तक प्रकाशनानंतर संस्थेचे सचिव माननीय राहुल मुळे यांच्या हस्ते विलास काकळीज व सौ. सुनीता काकळीज यांचा सन्मान करण्यात आला. विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वतीने श्रीमती थोरात मॅडम यांनी सौ. सुनीता काकळीज यांचा, तर . सुरेश नवसारे यांनी विलास काकळीज सर यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. पालक-शिक्षक संघाच्या वतीने सुधाकर निकम व सौ भारती बोरसे यांनीही त्यांचा सत्कार केला.

याप्रसंगी श्रीमती निवेदिता सांगळे, . राकेश ननावरे, . जयंत निकम, प्रा . सुरेश नारायणे, अरविंद सूर्यवंशी आणि श्रीमती शालिनी हिरे यांनी आपल्या मनोगतातून आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या अध्यापनातील समर्पण, सहकाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, साहित्यिक योगदान आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेल्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन . प्रवीण अहिरे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक प्रतिनिधी . सुरेश नवसारे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती रूपाली झोडगेकर यांनी केले. तसेच एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि काकळीज परिवाराच्या सहकार्याने हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

