
नाशिकरोड 🙁 प्रतिनिधी ) पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल मध्ये दीपावली निमित्त स्वर दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जनार्दन स्वामी मठातील गोरख गीते महाराज यांचेसह त्यांच्या पाठशाळेतील बाल कलाकार यांनी प्रभू श्री रामाचे भजने तर काही शिक्षकांनी भक्तीगीते सादर केली. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष रावसाहेव गायधनी, प्राचार्य संजय पाटील, उपमुख्याध्यापक डॉ.गजानन होडे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुभाष ढोकणे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राचार्य संजय पाटील यांनी केले, प्रषोत्तमच्या परंपरेनुसार दरवर्षी स्वर दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. संपूर्ण शाळेला दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. भव्य रांगोळीने प्रांगण सजवले होते. कार्यक्रमास पुरुषोत्तम व आरंभचे शिक्षक, पालक शिक्षक संघाचे सदस्य उपस्थित होते. सर्व उपस्थितांना फराळाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन स्वाती धारकर यांनी केले आभार डॉ. गजानन होडे यांनी मानले.

