
|| वशिला||
ज्याचा आहे वशिला ।
त्याचे कुत्रे काशीला।।
ज्याचा नाही वशिला ।
त्याचे देवही वेशीला।।१||
साहेब येणार हाय |
सतरंज्या पसरू या ||
दाळ्या मुरमुरे खाऊ|
नेत्यांची झील धरू या||२||
युवा नेता पुढे आला||
सांगे क्रांतीचे भुषण||
मल मिळेना राशन|
ऐकतो रोज भाषण||३||
झालो बीए एमए पास|
शोध घेई नोकरीचा||||
गेला बाजार मास्तर|
मुकादम , शिपायाचा||४||
ऐकतो रोज टोमणे|
जीव होई लाही लाही||
रोज घाली हेलपाटे|
वाट सापडत नाही||५||
एमकेसिएल झाला|
नोकरी मिळाली त्याला||
आयटीचं चांग भलं|
भक्कम ,पाया रोवला||६||
कवि-वाळू रघुनाथ आहेर नाशिक .

