
परतवाडा ( प्रतिनिधी )
दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई ,शाखा अमरावतीचे व्यवस्थापक मा.श्री किशोर राऊत यांचा ५७ वा वाढदिवसानिमित्त सत्कार व सामाजिक,आर्थिक कार्या बद्दल गौरव कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान,अमरावती तर्फे शाल,पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व प्रा.बुंदेले लिखित ‘अभंग तरंग ‘ हा काव्यसंग्रह व ‘दारूनं मेला ओ माय’ ही एकांकिका देऊन प्रतिष्ठानचे अध्यक्ष साहित्यिक व अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी तसेच मा.श्री.शांतारामजी उमाळे डॉ.बि.आर.देशमुख,मा.श्री.
दिलीपराव देशमुख, प्रा.प्रभाकरराव ठाकरे, प्रा. बाबुराव शेळके, मा.मोहनराव माहोरे,प्रा.मनिष पाटील, मा.दिनेशराव उल्हे, मा.अवधूत रताळे यांनी दि.२९ ऑक्टोबर २०२६ रोजी माजी कृषिमंत्री डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या निवासस्थानी असलेल्या दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक लिमिटेड मुंबई शाखा टोपे नगर, अमरावती येथील बँकेच्या सभागृहात भावपूर्ण सत्कार करून हार्दिक शुभेच्छा दिल्या व अभिष्टचिंतन केले.
सत्काराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. शांतारामजी उमाळे तर प्रमुख अतिथी साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले,डॉ.बि.आर.देशमुख,मा.श्री.दिलीपराव देशमुख, प्रा.प्रभाकरराव ठाकरे, प्रा . बाबुराव शेळके,मा.मोहनराव माहोरे,प्रा.मनिष पाटील,
मा.दिनेशराव उल्हे, मा.अवधूत रताळे होते.
सत्काराच्या कार्यक्रमाचा प्रारंभ प्रा.अरुण बुंदेले यांनी सत्कारमूर्ती मा.किशोर राऊत यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वावरील स्वरचित अभंग गायनाने केला.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अरुण बुंदेले यांचे मनोगत
प्रमुख अतिथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अरुण बुंदेले आपल्या भाषणात म्हणाले की," सत्कारमूर्ती मा.किशोर राऊत हे अकोला श्री शिवाजी कॉलेज एन सी सी दोन वर्षं सिनियर अंडर ऑफिसर होते. १२ कॅम्प ज्यात दोन राज्यस्तरीय एन एस एस तर्फे दिल्ली येथील २६ जानेवारी १९९१ ला राजपथ येथील संचालनात त्यांनी भाग घेतला होता.१९९२ ला दी महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव बँकेच्या मुंबई येथील मुख्य शाखेत २७ वर्षे ते कार्यरत होते.२०२० पासून या बँकेच्या अमरावती शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. शाखेचा मागील पाच वर्षांपासूनचा लेखाजोखा बघितला तर ठेवी १५०-२०० कोटी व कर्ज ६-७ कोटी पर्यंत पोहोचले आहे.
मा.कर्नाड साहेब,मा.दीपक पवार साहेब,मा.सुधीर केदार,मा.अविनाश देशपांडे, मा.आय. एम. देसाई यांच्या सारख्या दिग्गज अधिकारी वर्गासोबत त्यांना सहवास लाभल्यामुळे त्यांच्या कामाच्या अनुभवाचा खरा फायदा करून घ्यायचा त्यांनी ठरवले . आधी शाखेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांना विश्वासात घेऊन योजना आखणे सुरू केले .पाहता पाहता कर्ज व्यवहार पण चांगल्या प्रकारे वृद्धिंगत झाला आणि विशेष म्हणजे नुसता कर्ज व्यवहार वाढला नाही तर NO NPA NO 1 ₹ OVER DUE हा कित्ता मागील पाच वर्षांपासून सुरू आहे. आज जरी व्याज दर कमी झाले आहेत तरी नुसते जिल्हा बँक, क्रेडिट सोसायटी, वैयक्तिक ठेवीदार विश्वास संपादन व चांगल्या
सेवेमुळे आजही शाखेच्या ठेवी ₹३०० कोटी पर्यंत पोहोचल्या आहेत. मार्च २०२६ पर्यंत ४०० पार चा ध्यास टिम अमरावती ने घेतला आहे.या शाखेत ट्रेनी असोसिएट म्हणून आधी आकाश लाडूकर, पल्लवी ठाकरे सध्या अनिता राऊत व साहिल काकडे रूजू झाले . त्यांना श्री राऊत यांनी एकच सांगितले की,माणूस कामाने ओळखला गेला पाहिजे . त्यांच्या टिमवर्क मुळे व सर्वांना आपलेसे करून घेण्याच्या वृत्तीने शाखेची प्रगती व्यवस्थापक श्री किशोर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
भारत कृषक समाजाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. शाखा व्यवस्थापक एका प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले श्री
किशोर राऊत यांना ५७ या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! अभिष्टचिंतन! आणि पुढील कार्यासाठी मनस्वी सदिच्छा!”असे विचार व्यक्त केले.
सत्कर्मामुळे सर्वांचे मन जिंकणारे मा.किशोर राऊत
– मा.शांतारामजी उमाळे
सत्काराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.शांतारामजी उमाळे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की," दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँके मुंबई च्या अमरावती शाखेचे व्यवस्थापक श्री किशोर राऊत यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन! त्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या कार्यामुळे आज शाखा भरभराटीस आलेली आहे. सर्व कर्मचाऱ्यांवर त्यांचा विश्वास आहे व सर्व कर्मचाऱ्यांचा सुद्धा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळे आपल्या कार्यामुळे त्यांनी सर्वांचे मन जिंकून घेतले आहे .अशा या शाखा व्यवस्थापकाचा वाढदिवसानिमित्त कै.मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे व त्यांच्या सर्व मित्र मंडळी तर्फे जो त्यांचा सत्कार करण्यात आला .तो त्यांचा सत्कार नसून त्यांच्या कार्याचा सत्कार आहे.यापुढेही ते असेच कार्य करून बँकेची भरभराट करीत राहो अशी शुभेच्छा त्यांना ५७ व्या वाढदिवसाच्या देतो."असे विचार व्यक्त केले.
वाढदिवसानिमित्त केलेला सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी
– मा.किशोर राऊत
सत्कारमूर्ती मा.किशोर राऊत हे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की,”कोणतीही गोष्ट जर करायची असेल तर ती प्रथम मनात ठरवावी लागते आणि नंतर त्याची अंमलबजावणी करावी लागते. मी या शाखेच्या भरभराटीसाठीचे जे मनात विचार ठरवले होते ते पूर्णपणे आचरणात आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आज बँकेची भरभराट होत आहे त्यासाठी मी एकटा कारणीभूत नाही तर माझे वरिष्ठ अधिकारी आणि माझी टीम ही सुद्धा कारणीभूत आहे त्यामुळेच मी हे सर्व करू शकलो .माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या कार्याचा आई-वडिलांवर प्रेम करणारे प्रा.अरुण बुंदेले यांनी त्यांच्या प्रतिष्ठानद्वारे जो माझा सत्कार केला .हा सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त माझा सत्कार करणार्या व शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो.”असे विचार व्यक्त केले.
बँक शाखेचे मनस्वी कार्य करणारे मा.किशोर राऊत
– प्रा.प्रभाकरराव ठाकरे
प्रमुख अतिथी प्रा. प्रभाकरराव ठाकरे आपल्या भाषणात शुभेच्छा देताना म्हणाले की," .शाखा व्यवस्थापक मा.किशोर राऊत यांचे कार्य मनस्वी आहे त्यांच्या कार्यकाळातील बँकेची प्रगती ही अवर्णनीय आहे .आज झालेली बँकेची प्रगती त्यांच्या प्रामाणिकपणाची पावती आहे. आदर्श शिक्षक प्रा. अरुण बुंदेले यांनी स्वतःच्या प्रतिष्ठान द्वारे केलेला सत्कार व मा.किशोर राऊत यांच्या मित्र मंडळींनी केलेला त्यांचा सत्कार त्यांना पुढील कार्याची प्रेरणा देईल.त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांचे अभिष्टचिंतन करतो."असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन साहिल काकडे तर आभार श्री मनोहरराव माहोरे यांनी मानले.कार्यक्रमाचे सांगता अल्पोपहाराने झाली.
कार्यक्रमाला
अनिता राऊत,साहील काकडे, दीपक मानकर,
अनिल चव्हाण तथा श्री किशोर राऊत यांच्यावर व बँकेवर प्रेम करणाऱ्यांची उपस्थिती होती.

