नाशिक ( प्रतिनिधी )-आदर्श आणि सकारात्मक विचार जीवनाला दिशा देण्यासाठी उपयुक्त असतात. अशा सकारात्मक विचारांनीच सुदृढ समाजाची निर्मिती होत असते, असे प्रतिपादन नाशिक मर्चन्ट बँकेचे माजी व्हा.चेअरमन प्रकाश दायमा यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या 'गिरजा' या २८व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका प्रा.सुमती पवार, आ.सीमा हिरे, डॉ.अश्विनी बोरस्ते, संपादक सुरेश पवार, गिरजा महिला मंचच्या जिल्हाध्यक्ष शितल कुयटे, भारती निकम, भाग्यश्री चौधरी मंचावर उपस्थित होते.
दायमा पुढे म्हणाले की, समाजाला चांगले देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आचार, विचार आणि संस्कारातून आयुष्य सुंदर बनवता येते. समाजाला देण्याची वृत्ती अंगीकारली तर जीवनात अशक्य असे काहीच नाही, असेही ते म्हणाले.
आ.सीमा हिरे, डॉ.अश्विनी बोरस्ते यांनीही मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंचच्या जिल्हाध्यक्ष शितल कुयटे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दामिनी पवार, माधुरी अमृतकर, वैशाली शिंदे, अलका दराडे, कविता जाधव, कल्पना माने, भारती देव, कविता कासार, कल्पना जाधव, आशा गोवर्धने, भारती कोठारी यांनी परिश्रम घेतले.
मानपत्र वाचन ज्योती हाडस यांनी केले. प्रास्ताविक भाग्यश्री चौधरी यांनी तर आभार भारती निकम यांनी मानले. सूत्रसंचालन सविता वैद्य यांनी केले.