
नाशिक. ( प्रतिनिधी ) दिनांक ०३ नोव्हेंबर : दि. १३ ते १५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान सिंधुदुर्ग येथे ५३ वी राज्यस्तरीय सब ज्युनियर ज्युदो स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नाशिक जिल्हाचे संघ सहभागी होणार आहेत. या खेळाडूंची निवड करण्यासाठी गुरवार दिनांक ५ नोव्हेंबर, २०२६ रोजी जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन गुरवार दिनांक ४ नोव्हेंबर, २०२६ रोजी यशवंत व्यायाम शाळेच्या ज्युदो हॉलमध्ये करण्यात आले आहे.
यामध्ये १२ वर्षे ते १५ वर्षे असे वयोगट असणार आहेत. यासाठी खेळाडूंची जन्मतारीख सन २०१२, सन २०१३ आणि सन २०१४ या सालात असावी. या स्पर्धेत वजन गट मुलांसाठी २५ ते ३०, ३५, ४०, ४५, ५०, ५५, ६०, ६६ आणि ६६ च्या पुढे असे असणार आहेत तर मुलींसाठी वजन गट २३ ते २८, ३२,३६, ४०, ४४, ४८, ५२, ५७ आणि ५७ च्या पुढे असे असणार आहेत.
या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवहान जिल्हा ज्युदो असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी गुरवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता आपले आधार कार्ड, आणि जन्म तारखेचा दाखला याची सत्य प्रत बरोबर आणावी असे आयोजकयांच्या वतीने कळवण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी प्रशिक्षक योगेश शिंदे मो. ९४०३२७५८३६, स्वप्नील शिंदे मो. ९५०३३४५७१३ , सुहास मैंद मो क्र. ८८८८३५८९६९ यांच्याशी संपर्क करावा.

