
” आजच्या काळात, अध्यात्मिक व धार्मिक पुस्तके यांची निर्मिती होणे ही काळाची गरज आहे असे उदगार प्रा दिलीप फडके यांनी अध्यक्षपदा वरून बोलताना काढले. इंदिरानगर नाशिक येथे भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडी व बल्लाळ प्रकाशन यांच्या वतीने पुस्तक प्रकाशन प्रसंगी श्री फडके बोलताना म्हणाले. “येणे वाग्यज्ञे तोषावे या” श्री विद्याधर ताठे व “गिरनार.. चल दिये, बुलावा आया था” या श्री विवेक थत्ते यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ॲड श्री अविनाश भिडे उपस्थित होते. त्यांनी ह्या उपक्रमाचे कौतुक केले. या प्रसंगी आमदार सौ सीमा ताई हिरे, महेश हिरे, भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर अध्यक्ष श्री सुनील केदार, नगरसेवक दिनकर आण्णा पाटील, श्याम भाऊ बडोदे, अजिंक्य साने, सचिन कुलकर्णी, सुनील खोडे, राजेंद्र जड़े, देवदत्त जोशी, नाना बच्छाव, गोविंद केंगे यांची विशेष उपस्थिती होती.
लेखक विद्याधर ताठे व विवेक थत्ते सांस्कृतिक आघाडीचे प्रा अविनाश बल्लाळ व दिलीप बल्लाळ यांची भाषणे झाली व सर्वांनी पुस्तक प्रकाशन ला भरभरून शुभेच्छा दिल्या. लेखक विद्याधर ताठे व विवेक थत्ते यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रम मोठया दिमाखात संपन्न झाला. प्रा दिलीप फडके व अविनाश भिडे यांचा परिचय सुहास टिपरे जेष्ठ साहित्यिक यांनी करून दिला संपूर्ण कार्यक्रम चे सूत्रसंचालन सौं श्रद्धा भुरे यांनी करून कार्यक्रमामध्ये रंगत आणली. शार्दुल बल्लाळ यांनी आभार मानले. कार्यक्रम साठी साहित्यिक क्षेत्र मध्ये असलेली शेकडो मान्यवर मंडळी उपस्थित होती.
मानस गोसावी यांच्या मोहन वीणा आणि लितेश जेठवा यांच्या बासरी वादनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

