
सिन्नर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकर यांना जयंतीनिमित्त (ता.१ नोव्हेंबर) महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिन्नर शाखेतर्फे अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना तसेच डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आले.यावेळी शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकर यांनी समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा,चालीरीती, धर्माच्या नावाखाली होणारे शोषण थांबविण्यासाठी आपले जीवन समर्पित केले.काळी जादू,अंधश्रद्धा जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न केले त्याची फलश्रुती म्हणून त्यांच्या निधनानंतर जादूटोणा विरोधी कायदा संमत करण्यात आला. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन,संत समाजसुधारकांचे विवेकी विचार रुजविण्यासाठी जनजागृती केली.त्यांचाच वारसा पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रयत्नशील आहे.असा सूर यावेळी विविध मान्यवरांनी केलेल्या मनोगतातून व्यक्त करण्यात आला.यावेळी जिल्हा महा.अंनिसचे उपाध्यक्ष डॉ.श्यामसुंदर झळके,सिन्नर शाखेचे कार्याध्यक्ष सुकदेव वाघ ,उपाध्यक्ष सुनील कुऱ्हे, हरिभाऊ तांबे ,महामित्र दत्ता वायचळे,प्रा.प्रभाकर चतुर, आरपीआय चे तालुका अध्यक्ष (आठवले गट) मंगेश जाधव,बाळासाहेब आढाव यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी राजेंद्र दिवे,धर्मपाल शिरसाट,सुरेश गीते,मधुकर जाधव ,राधू साळवे,रवींद्र जगताप ,किरण जाधव, दिव्या व कलश कुऱ्हे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .प्रभाकर चतुर यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष सुकदेव वाघ यांनी केले.

