
सिन्नर: (प्रतिनिधी ) महात्मा फुले द्वि जन्म शताब्दी वर्ष सुरू आहे. आयटक चा आज 107 वा वर्धापन दिन निमित्ताने फुले यांचे कामगार वर्ग विषयी योगदान विषयावर बोलताना आनंद होत आहे. कामगार चळवळ मार्क्स, फुले विचार आजही महत्त्वाचा दुवा आहे. महात्मा फुले यांचे सहकारी सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे यांनी रविवार ची सुट्टी मिळून दिली. कामगार वर्ग ला जागरूक करण्याचे काम केले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, नारायण मेघाजी लोखंडे यांचे महत्वाचे योगदान आहे. आज ही फुले विचार प्रेरणादायी आहे. ते विचार सर्वांपर्यंत पोहचवले पाहिजेत असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक महामित्र दत्ता वायचळे यांनी हुतात्मा स्मारक सिन्नर येथे आयटक कामगार संघटना 107 वर्धापन दिन कार्यक्रम प्रसंगी केले.

या प्रसंगी विचारमंचवर आयटक राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले, आयटक जिल्हा सह सचिव कॉम्रेड भीमा पाटील, ग्राम रोजगार सेवक नेते कॉम्रेड अनिल बुचकुल, महेंद्र थोरात विडी कामगार नेत्या कॉम्रेड रेणुका वंजारी कॉम्रेड अंशकालीन स्त्री परिचर नेत्या कॉम्रेड हसीना शेख आशा नेत्या कॉम्रेड हेमलता कासार कॉम्रेड सविता हगवने , गट प्रवर्तक नेत्या कॉम्रेड सारिका घेगडमल, बांधकाम कामगार नेते कॉम्रेड कैलास मंजुळे , भारतीय कम्युनिस्ट पक्ष तालुका सचिव मारुती पवार, वीज कामगार नेते कॉम्रेड योगेश शिंदे उपस्थित होते.
आयटक राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले यांनी आयटक चा 106 वर्ष इतिहास सांगितला , आज केंद्र व राज्य सरकार कामगार कर्मचारी विरोधात धोरण राबवत आहे . योजना कर्मचारी, असंघटित कामगार ना न्याय मिळत नाही. सर्वांना किमान वेतन सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे.

जो देशासाठी काम करतो, देश उभा करतो त्यांना शासकीय कर्मचारी दर्जा मिळाला पाहिजे यासाठी येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. महात्मा फुले द्वि जन्म शताब्दी वर्ष निमित्ताने राज्य भर आयटक त्यांचा विचार जागर करण्यात येत आहे . महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर,कार्ल मार्क्स विचार कामगार वर्गाला लढायला बळ देते. असे प्रतिपादन केले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक कॉम्रेड भीमा पाटील यांनी केले आभार अनिल बुचकुल यांनी मानले.या प्रसंगी भीमा मेंगाळ, सुदाम गीते, रोहिणी सहाणे, बजरंग धुमाळ, सविता रावले, संजय जाधव , सागर मेंगाळ, प्रेरणा जाधव, गोरख ब्राह्मणे,आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

