
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४४३ वा दिवस

जगातील कोणताही देश मग तो कितीही बलाढ्य असो, केवळ आधुनिक विज्ञानाच्या पायावर, वा भौतिक सुख-सोयींच्या (Materialistic development) जोरावर दीर्घकाळ उभा राहू शकणार नाही. आत्म्याशिवायचे विज्ञान नको. जगाचा इतिहासच आपल्याला सांगतो की अशा पायावर जे देश उभे होते ते सर्व आता नष्ट झाले आहेत. प्रथमतः अशा विचारांची भारतात येणारी लाट आपण थोपवून धरली पाहिजे. याकरता धर्माला आधुनिक विज्ञानाच्या आघातांना तोंड देता यावे म्हणून प्रत्येकाला वेदांची शिकवण द्या. वेदांमधील ज्ञान विशेषतः उपनिषदे वा वेदांत हे केवळ कर्मकांडापुरते मर्यादित नाही. ते आत्मज्ञान, वैश्विक बंधुभाव वसुधैव कुटुम्बकम् आणि सत्याचा शोध घेण्यास शिकवते. एका हातात आधुनिक विज्ञान असेल आणि दुसऱ्या हातात वेदांचे, अध्यात्माचे शाश्वत ज्ञान असेल. तरच एक बलाढ्य आणि चिरंतन टिकणारा समाज निर्माण होऊ शकतो.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर कार्तिक उर्जमास १२ शके १९४८
★ अश्विन वद्य /कृष्ण ९
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ मंगळवार दि. ३ नोव्हेंबर २०२६
★ १८१९ प्रसिध्द शाहीर, ‘फटका’ कार, गोंधळी, कवी अनंत भवानीबाबा घोलप ऊर्फ अनंत फंदी यांचा स्मृतिदिन
★ १८३८ ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ हे जगातील सर्वाधिक खपाचे इंग्लिश दैनिक ‘द बॉम्बे टाइम्स अँड जर्नल ऑफ कॉमर्स’ या नावाने मुंबईत सुरू झाले.
★ १९३३ कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धान्त या विषयांतील कार्यासाठी नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांचा जन्मदिन.

