
प्रभाकर मोरे :
प्रभाकर वामन मोरे उर्फ आबासाहेब हा माझा शाळकरी मित्र दीपावलीच्या प्रकाशाच्या पर्वात अंधार करून इहलोक सोडून गेला. एका बाकावर बसणारा आपला शाळकरी मित्र जेव्हा हे जग सोडून जातो ना, तेव्हा मनात कालवा-कालव होते. हे दुःख, ही वेदना शब्दांपलीकडे असते. तसे आम्ही आता सत्तरीच्या घरात पोचलो. दिवसेंदिवस एक एक कडी गळावयास लागली आहे. आला तो जाणार हे जरी खरे असले तरी; वेळ आणि काळ याला वेगळेपण असते. प्रभाकरच्या बाबतीत वेळेवर काळाने बाजी मारली आहे. वेळ हरली; काळ जिंकला. चार-पाच महिन्यांपूर्वी प्रभाकरची मुलगी प्रा. पूजाला पीएचडी पदवी मिळाली, त्याला मोठा आनंद झाला. नाशिकच्या पेपरमध्ये ही बातमी यावी, यासाठी त्याने मला पाठविली. छापून आली. बापाचा मुलीसाठी तुटणारा जीव आज अचानक निघून गेला. हे दुःख पहाडाएवढे आहे. हे दुःख पेलण्याची शक्ती निर्मिक प्रदान करो, भावपूर्ण श्रद्धांजली !
- भास्कर कदम नांदगावकर.

