
नाशिकरोड:
नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ प्राधिकरण आणि ‘कृतार्थ सेवाभावी संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘स्वर साधना धर्मादाय संस्था, आणि नृत्यबेला फाउंडेशन नागपूर’ यांच्या संगीतमय व नावीन्यपूर्ण ‘गीत रामायण’ कार्यक्रमाचे रविवारी (१ नोव्हेंबर २०२६) भव्य आयोजन करण्यात आले होते.

नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयाजवळील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी पार पडलेल्या या सुरेल सोहळ्यास नाशिककरांनी अभूतपूर्व व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात ‘स्वये श्री राम प्रभू ऐकती…’, ‘पराधीन आहे

जगती..’, ‘सेतू बांधारे..’ अशी गीत रामायणातील विविध दर्जेदार गीतं सादर करण्यात आली. या गीतांवर नृत्यबेला फाउंडेशन च्या नृत्त्यागनांनी विविध नृत्यप्रकार सादर करून उपस्थित श्रोत्यांना दोन तास खिळवून ठेवले.

नाशिकरोड मध्ये अलीकडील काळात प्रथमच अशा भव्य व भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण नाट्यगृह खऱ्या अर्थाने श्रीरामांच्या पावन स्मरणाने आणि रसिकांच्या उपस्थितीने लोकार्पित झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. आयोजकांकडून या कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
यासारख्या अप्रतिम आणि दर्जात्मक कार्यक्रमांचे भविष्यातही नाशिकरोड परिसरात आयोजन सातत्याने व्हावे, अशी इच्छा रसिकांनी व्यक्त केली आहे. कार्यक्रमांस 450 च्या आसपास श्रोते उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात रामरक्षा पठनाने करण्यात आली. तर सांगता संपूर्ण वंदे मातरम ने झाली.
यांची होती उपस्थिती
अरविंद लोखंडे (विभागीय उपायुक्त, नाशिकरोड)
अरुंधती शर्मा (मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग)
मिलिंद देशपांडे (संचालक, महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी संस्था – ‘मित्रा’)
मोहन व्याघ्रे (स्वर साधना फाउंडेशन) प्रमोदराव कुलकर्णी (विभाग कार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ)
राजेशजी राव (विभाग सहकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ)
मारुतीराव कुलकर्णी (कार्याध्यक्ष, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ)
राहुल मुळे (सेक्रेटरी, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ)
रणजीत सिंग आनंद (गुरुद्वारा कमिटी, नाशिकरोड)
अशोकजी तापडिया (संचालक, बिझनेस बँक)
नाना पाटील (अध्यक्ष, कृतार्थ परिवार)
गोपाल लाल व आयोजन समितीचे सर्व सदस्य.

