
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४४४ वा दिवस

जर तुमच्या जवळ असलेले धन हे इतऱ्यांच्या फायद्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्याचे मूल्य आहे, नाहीतर ते फक्त वाईटाचा डोंगर आहे. त्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल तितके तुमच्या दृष्टीने चांगले आहे. कोणतीही गोष्ट जी तुम्हाला शारीरिक, मानसिक, बौद्धीक आणि आध्यात्मिक दृष्ट्या कमकुवत बनवते त्या गोष्टींना विषसमान मानून, त्यांचा पूर्णपणे त्याग केला पाहिजे. मग ती सत्ता असो, संपत्ती असो, प्रतिष्ठा असो वा विद्वत्ता असो. जीवनात सर्वकाही मिळवा, पण ते मिळवताना स्वतःची आंतरिक शक्ती (Moral Strength) कदापी गमावू नका. जे काही तुमच्याकडे आहे, त्याचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी वा जगाला सुंदर बनवण्यासाठी करा.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर कार्तिक उर्जमास १३ शके १९४८
★ अश्विन वद्य /कृष्ण १०
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ बुधवार दि. ४ नोव्हेंबर २०२६
★ १८४५ ब्रिटिशांविरुध्द सशस्त्र उठाव करणारे भारतीय सशस्त्र क्रांतींचे आद्य प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्मदिन.
★ १८८४ प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचा जन्मदिन
★ १८८४ ट्रॅक्टरचे निर्माते हॅरी फर्ग्युसन यांचा जन्मदिन
★ १८९४ महात्मा गांधीजींचे अनुयायी, कोकणचे गांधी सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर आप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्मदिन.
★ २००८ बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष झाले.

