
भगूर( प्रतिनिधी:)
भगूर पुत्र स्वातंत्र्य वीर सावरकर जयंती उत्सव समिती, भगूर यांच्या वतीने आगामी बुधवार, दिनांक ११ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य ‘स्वर दीपोत्सव’ (स्वरांचा दीप, सुरांचा उत्सव) या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, भगूर येथे संध्याकाळी ७ ते १० या वेळेत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या संगीत सोहळ्यात इंटरनॅशनल युथ फेस्टिव्हल गोल्ड मेडलॉजिस्ट, उत्तर महाराष्ट्र आयडॉल आणि ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ सेमि फायनललिस्ट श्री. हर्षद गोळेसर आणि ‘संगीत सम्राट’ सेमि फायनललिस्ट व ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ सेमि फायनललिस्ट सौ. दुहिता गोळेसर हे आपल्या सुरेल आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध करणार आहेत. तसेच त्यांना साथ देण्यासाठी श्री. स्वामीराज भिसे (निवेदक), श्री. आकाश बैरागी (साईड रिदम), श्री. संस्कार जानोरकर (हामोनियम), श्री. कृष्णा नवगीरे (पखवाज), श्री. निनाद कुष्णवलेकर (तब्बल) आणि श्री. हर्षद वडजे (कि.बोर्ड) हे कलाकार उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिला भगिनींमधून ११ भाग्यवंत भगिनींना विशेष पैठणीचे वाटप करण्यात येणार असून फराळ वाटपाचेही आयोजन करण्यात आले आहे.
पैठणी लकी ड्रॉची नोंदणी कार्यक्रमाच्या ठिकाणी १ तास अगोदर सुरू होईल, याची महिला भगिनींनी नोंद घ्यावी. कार्यक्रमासाठी खुर्चीची आसनव्यवस्था करण्यात आली असून रसिकांच्या सुरळीत प्रवेशासाठी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्वरांचा दीप आणि सुरांच्या या अनोख्या उत्सवासह दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकुटुंब व सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन भगूर पुत्र स्वातंत्र्य वीर सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.: समिती नावे. रमेश पवार, शेखर बागडे, राजेंद्र कापसे, अनील पवार, वसंत पाटील, प्रशांत कापसे, अमोल वालझाडे, उत्तमराव शिंदे, उत्तमराव जाधव, दशरथ हाटकर, निलेश हेमबाडे, मंगेश बागडे, गजानन कातकाडे , अविनाश कातकाडे, हेमंत हेमाडे, तानाजी करंजकर, राजेंद्र बागडे, दीपक बलकवडे, काकासाहेब देशमुख, प्रसाद आडके, विशाल बलकवडे, राजाभाऊ सोनवणे, प्रमोद जाधव, विक्रम सोनवणे, किशोर गायकवाड, प्रदीप देशमुख, शाम भागवत, निलेश ठाकूर , संदीप शिंदे, रवी महाले, चेतन बागडे, अशोक मोजाड, सुनील कासार, शिवाजी घुगे, संदीप शेटे, सुभाष जाधव, शैलेश उदावंत, प्रताप गायकवाड, मृत्युंजय कापसे, अमर शिरसाठ, चंद्रकांत कातकाडे, संभाजी देशमुख, सुमित चव्हाण, शाम देशमुख, पंकज शेलार, प्रकाश सुराणा, राजू चतुर, निलेश हसे, रवी व सर्व सावरकर समिती सदस्य देशमुख, विलास घोलप, सुनील कुंवर, संतोष पिंपळे, मंगेश करंजकर, संग्राम करंजकर, मनोज कुंवर, प्रशांत लोया, भूषण कापसे, सुनील थोरात, सचिन हेमबाडे, खंडेराव गायकवाड, दिलीप चव्हाण, दादासाहेब देशमुख, सुनिल जोरे

