
सिन्नर – ( प्रतिनिधी). : समस्त आदिवासी व समविचारी संघटना यांच्या वतीने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची 221 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, उमाजी राजे नाईक, भागोजी नाईक यांच्या त्रिशिल्पास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्रिशिल्पास अभिवादन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, भारत भूमीच्या रक्षणासाठी आणि जल, जंगल, जमीन अबाधित राखण्यासाठी, परकीयांच्या आक्रमणाविरुद्ध, ब्रिटिश सरकार व सावकारशाही यांनी देशातील मूळनिवासी यांच्यावर केलेल्या अन्यायाविरुद्ध राघोजी भांगरे यांनी ब्रिटिश सरकार व सावकारशाहीच्या विरोधात शस्त्र बंड पुकारले व त्यांना सळो की पळो करून सोडले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, “आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे इंग्रजांविरुद्ध लढणारे पहिले आदिवासी क्रांतिकारक होते. त्यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, जमीन, जंगल आणि स्वाभिमानासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांचे विचार आजच्या तरुण पिढीने जपले पाहिजेत.”
यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
युवा नेते उदय भाऊ सांगळे यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले की, राघोजी भांगरे यांचे बलिदान आपल्याला नेहमी प्रेरणा देत राहील. त्यांनी आदिवासी समाजासाठी केलेला त्याग कधीही विसरता येणार नाही.
माजी नगराध्यक्ष किरण डगळे यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले की, आदिवासी समाजाने एकत्र येऊन आपले हक्क मिळवले पाहिजेत. राघोजी भांगरे यांच्या विचारांवर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
कॉम्रेड हरिभाऊ तांबे यांनी सांगितले की, क्रांतिकारकांच्या जयंती फक्त साजरी न करता त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजेत. शोषणाविरुद्धचा लढा आजही सुरू ठेवण्याची गरज आहे.
स्तंभलेखक प्रा. प्रभाकर चतुर सर यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले की, सिन्नरमधील त्रिशिल्प हे आपल्यासाठी क्रांतीचे प्रेरणास्थान आहे. तरुणांनी इतिहास वाचला पाहिजे आणि क्रांतिकारकांचे कार्य समजून घेतले पाहिजे.
नगरसेवक अनिल सरवार यांनी सांगितले की, राघोजी भांगरे यांनी स्वाभिमानासाठी प्राण दिले. त्यांचा आदर्श घेऊन समाजाच्या विकासासाठी काम केले पाहिजे.
माजी नगरसेवक रुपेश मुठे यांनी सांगितले की, आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे. जयंती उत्सवातून एकजूट निर्माण होते.
ज्ञानेश्वर कुराडे यांनी सांगितले की, राघोजी भांगरे यांच्या लढ्यामुळे आदिवासी समाजाला ओळख मिळाली. त्यांचे विचार आजही तेवढेच महत्त्वाचे आहेत.
देवराम खेताडे सर यांनी सांगितले की, राष्ट्रप्रेम आणि संघटन यामुळेच समाज पुढे जाईल, हा संदेश राघोजी भांगरे यांनी दिला. त्यांच्या कार्याचे स्मरण आपण कायम ठेवले पाहिजे.
नितीन परदेशी यांनी सांगितले की, क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे आज आपण मोकळा श्वास घेत आहोत. त्यांच्या जयंती निमित्त समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे.
दत्तात्रेय आचारी यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले की, राघोजी भांगरे यांच्या क्रांतीची ज्योत आपण सर्वांनी तेवत ठेवली पाहिजे. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे हे आपले कर्तव्य आहे.
सोनू मेंगाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, राघोजी भांगरे यांच्या बलिदानामुळेच आज आदिवासी समाजाला स्वाभिमानाने जगता येत आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांचे विचार पुढे नेण्याचा संकल्प करूया.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश धोंगडे यांनी केले. तर आभार जमीर सय्यद सर यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी मनीषा भालेराव, सुनील गोपी, सोनू मेंगाळ, अजय कडाळे, प्रकाश मदगे, प्रकाश भाटजीरे, बाळासाहेब कराड, राहुल भांगरे, संतोष बेंडकुळे, सुरेश गोडे, श्याम कानकुटे, रामेश डोंगरे आदी मान्यवर, संविधानप्रेमी व समविचारी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

