
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४४९ वा दिवस

हजार वर्षांपासून बंद असलेल्या खोलीतील अंधार, केवळ एक काडी पेटवताच एका क्षणात नष्ट होतो. त्याचप्रमाणे, मनुष्याच्या मनातील अनेक जन्मांचे अज्ञान किंवा नकारात्मकता ही ईश्वरी ज्ञान आणि आत्मविश्वासाचा एक छोटासा दिवा लावल्याने लगेच दूर होतो. जेव्हा, जेव्हा तुमचे हृदय दुःखाने भरून जाईल, तेव्हा, तेव्हा उठून ताठ मानेने उभे राहा. ज्ञानरुपी एक दिवा पेटवा, अंधारात आणि दुःखात सतत बसून राहू नका. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाची वाट निवडा. नेहमी काहीतरी चांगले करत राहा, चांगला विचार करा आणि सदैव आनंदी राहा. जगामध्ये सर्वत्र ज्ञानाचा प्रकाश पोहचवा, हा प्रकाश गरिबांपर्यंत आणि श्रीमंतांपर्यंतही पोहोचवा कारण त्यांना त्याची गरज आहे. आपल्या सुखातील वा आनंदातील काही भाग गरिबांना आणि वंचितांना देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणे हीच खरी ईश्वरी पूजा आहे. आंतरिक सुप्त शक्तींना जागे करणे, भीती आणि दुर्बलतेचा त्याग करणे आणि संपूर्ण जगाला प्रेमाच्या प्रकाशाने उजळून टाकणे हे आपले आद्य कर्तव्य आहे तेच आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय असावे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर कार्तिक उर्जमास १८ शके १९४८
★ अश्विन अमावस्या
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ सोमवार दि. ९ नोव्हेंबर २०२६
★ सोमवती अमावस्या
★ १८७७ ‘सारे जहाँसे अच्छा’चे या राष्ट्रभक्तीपर गीताचे रचनाकार मोहम्मद इक्बाल यांचा जन्मदिन
★ १९२४ ख्यालगायक, गुरु व बंदिशकार पंडित चिंतामण रघुनाथ तथा सी. आर. व्यास यांचा जन्मदिन
★ १९३१ लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत एल. एम. सिंघवी यांचा जन्मदिन
★ १९६२ स्त्री शिक्षण व विधवा विवाहास प्रोत्साहन देणारे समाजसुधारक भारतरत्न महर्षी आण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे यांचा स्मृतिदिन.
★ १९६७ मराठी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, नटवर्य दामोदर गोपाळ ऊर्फ बाबूराव पेंढारकर यांचा स्मृतिदिन.
★ २००५ भारताचे १० वे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचा स्मृतिदिन.

