
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३४४८ वा दिवस

*ॐ असतो मा सद्गमय*
*तमसो मा जोतिर्गमय*
*मृत्योर्मा अमृतं गमय ।*
साऱ्या जगाला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाची आवश्यकता आहे. हा ज्ञानरुपी प्रकाश मिळवण्यासाठी जग मोठ्या उत्सुकतेने आपल्याकडे पाहत आहे. आणि केवळ भारतीयांजवळ हा ज्ञानरुपी तेजोमय प्रकाश आहे. आपण तो मुक्तपणे जगाला वाटून दिला पाहिजे. हे आपले कर्तव्य आहे, जेणेकरून संपूर्ण मानवजातीचे कल्याण व्हावे, सार्या जगात या प्रकाशाचा झगमगाटात व्हायला हवा. यातून विश्वबंधुत्वाची भावना वाढीस लागेल. त्याग आणि सेवा हेच भारताचे राष्ट्रीय आदर्श आहेत. आणि सेवाभावचा प्रचार केवळ भारतातच झाला आहे, केवळ येथेच अति प्राचीन काळापासून अगदी वर्तमान काळापर्यंत प्रत्येक माणसांसमोर सर्वोच्च आदर्श ठेवले गेले आहेत. मानव जातीविषयी हा सद्गुण या मातृभूमीतूनच प्रकट झाला आहे.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर कार्तिक उर्जमास १७ शके १९४८
★ अश्विन वद्य /कृष्ण १४
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ रविवार दि. ८ नोव्हेंबर २०२६
★ नरक चतुर्दशी
★ लक्ष्मी पूजन, कुबेर पूजन
★ वही, रोजमेळा पूजन
★ अलक्ष्मी निस्सारण
★ अभ्यंगस्नान, यमतर्पण
★ १९१९ सुप्रसिध्द मराठी लेखक, नाटककार, अभिनेते, कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक, संगीतकार, विनोदवीर बहुआयामी, महाराष्ट्रचं लाडक व्यक्तीमत्व पुरुषोत्तम लक्ष्मण तथा पु. ल. देशपांडे यांचा जन्मदिन.
★ २०१६ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० व १००० च्या नोटा अचानकपणे व्यवहारातून रद्द केल्या होत्या.
★ जागतिक शहरीकरण दिन.
★ आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन
★ दिपावलीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा…
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

