
मालेगाव ( प्रतिनिधी )- शुक्रवार (दि १४ ऑगस्ट) रात्री १० ते १२ या वेळात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्र सेवा दल मैदान, रेवा बाग, पंचायत समिती जवळ, मालेगाव कॅम्प येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या स्वागत समारंभाचे आयोजन राष्ट्र सेवा दल, मालेगाव शाखे तर्फे करण्यात आले आहे. या दिवशी रात्री १२.०१ वा म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी सर्वजण राष्ट्रध्वजास मानवंदना देणार आहेत.
हयावर्षी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हुणुन जेष्ठ सेवा दल सैनिक व मामको बँक संचालक उमेश अस्मर, आदिनाथ एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉ गौरव कापडिया हे असणार आहेत.
साथी प्रतिष्ठानचे शाहीर प्रकाश वाघ यांचा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे. तसेच मान्यवराचा सन्मान सोहळा होणार आहे.
गेल्या सहा दशकाहून अधिक काळापासून हा कार्यक्रम सेवा दल आयोजित करीत आहे. यावर्षी देखील मालेगाव मधील पुरोगामी साथीनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्र सेवा दल जिल्हा कार्याध्यक्ष अशोक पठाडे, जिल्हा संघटक नचिकेत कोळपकर,राज्य मंडळ सदस्य राजीव वडगे, माजी अध्यक्ष विलास वडगे, रविराज सोनार, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र दिघे, संघटक मोरेश्वर जोशी, बळवंत अहिरे, जिल्हा प्रतिनिधी विष्णू गुमाडे, महिला विभाग प्रमुख गीता जोशी, कपिल कनोज, नरेश जगताप, सारंग पाठक यांनी राष्ट्र सेवा दल आणि समविचारी संस्था संघटना मालेगाव यांचे वतीने करण्यात आले आहे.

