
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३६० वा दिवस

अनुमानातील सदोषतेविषयी पुढील गोष्ट लक्षात ठेवावयास हवी. अनुभवाचे साधन, अनुभवाची पद्धती आणि त्या अनुभवाची पुनरावृत्ती ही सारी विशुद्ध असली तरच प्रत्यक्ष अनुभव हा प्रमाण मानता येतो. इंद्रियातील विकृतीमुळे किंवा भावविवशतेमुळे निरीक्षणात दोष उत्पन्न होतात. म्हणूनच प्रत्यक्ष अनुभव हा अनुमानाचाच एक प्रकार होय. म्हणून सगळे मानवी ज्ञान हे अनिश्चित असते आणि ते चुकीचेही असू शकते. खरा साक्षी कुणाला म्हणावयाचे? तो सांगत असलेली गोष्ट ही त्याच्या प्रत्यक्ष अनुभवास आलेली असली तरच त्याला खरा साक्षी म्हणावयाचे. ह्या न्यायाने वेद सत्य आहेत, कारण सुयोग्य वा अधिकारी व्यक्तींचा पुरावा त्यात समाविष्ट आहे.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर श्रावण २१ शके १९४८
★ आषाढ अमावस्या
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ बुधवार दि. १२ ऑगस्ट २०२६
★ गतहारी /दिवटी अमावस्या
★ दीप पूजन…
★ १९१९ भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्मदिन.
★ १९६४ लेखक, पत्रकार, दुसर्या महायुद्धातील गुप्तहेर आणि जेम्स बाँडचा जनक इयान फ्लेमिंग यांचा स्मृतिदिन.
★ आंतरराष्ट्रीय हत्ती दिन.
★ आंतरराष्ट्रीय युवा दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक

