
नाशिक : सरस्वती माध्यमिक विद्यालय मूळडोंगरी येथे संस्थेचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली Quick Heal Foundation आणि CMCS College यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात Cyber Warriors – Snehal Santosh Bahikar आणि Yogini Nitin Ahire, CMCS Collegeच्या विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना फिशिंग, स्मिशिंग, विशिंग, OTP सुरक्षा, मजबूत पासवर्ड, सोशल मीडिया सुरक्षितता आणि ऑनलाइन गोपनीयता याबाबत मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधत “Safe or Unsafe” या उपक्रमाद्वारे सायबर सुरक्षेचे महत्त्व सोप्या व प्रभावी पद्धतीने समजावून सांगण्यात आले. ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.या उपक्रमाला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका,शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित व जबाबदार डिजिटल वापराबाबत जागरूकता निर्माण झाली.

