
नाशिक ( प्रतिनिधी ) : यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने दर वर्षीप्रमाणे दिनांक १६ ते १८ सप्टेंबर, २०२६ दरम्यान ३८ व्या खुल्या शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या आजच्या
तिसऱ्या दिवशी खेळल्या गेलेल्या बाद फेरीच्या सामन्यात चांगलीच चूरस बघायला मिळाली.
१४ वर्षे मुलींच्या गटात र. ज. चव्हाण आणि केंद्रीय विद्यालाय यांनी आपले उपांन्त्य सामने जिंकून अंतीम फेरीत प्रवेश केला.
१४ वर्षे मुलाच्या गटात केंद्रीय विद्यालय आणि लिटिल एंजल, मालेगांव यांनी आपले उपांन्त्य सामने जिंकून अंतीम फेरीत प्रवेश केला.
१७ वर्षे मुलींच्या गटात र. ज. चव्हाण, केंद्रीय विद्यालय आणि होरायझन या सघानी साखळी सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली.
१७ वर्षे मुलाच्या सेंट लोॉरे्स आणि लिटिल एंजल यांनी अंतीम फेरीत प्रवेश केला.

१९ वर्षे मुलाच्या गटात केंद्रीय विद्यालय, के. ती.एच. एम., व्ही. एन. ना इक, गोखले ओझर आणि गोखले नाशीक या सघानी उपउपांत्य फेरीेत प्रवेश मिळवीला.
पाऊस आल्याने आजचे सर्व गटांंचे अंतीम सामने उद्या होणार आहेत
त्यानंतर पारितोषीक वितरण समारांभ होणार आहे.
अशी माहिती आयोजकानी दिली.
उद्या होणंरे सामने :-
१४ वर्षे मुले : १) केंद्रीय विद्यालय विरुद्ध लिटिल एंजल मालेगांव
१४ वर्षे मुली : १) केंद्रीय विद्यालय विरुद्ध र. ज. चव्हाण.
१७ वर्षे मुले : १) सेंट लॉरेन्स स्कुल, विरुद्ध लिटिल एंजल, मालेगांव.
१७ वर्षे मुली : १) हिरायझन विरुद्ध र. ज. चव्हाण.
१९वर्षे मुले : उप उपांत्य सामने –
: १) k. T.h.M विरुद्ध केंद्रीय विद्यालय
२) व्ही. एन. नाईक विरुद्ध गोखले, ओझर.

