
सिन्नर (प्रतिनिधी ) १ जुलै २०२६ राष्ट्रीय डाॅक्टर दिन व महाराष्ट्र कृषी दिन शिवप्रेमींच्या वतीने साजरा करण्यात आला
या कार्यक्रमाची सुरुवात छ. शिवाजी महाराज व डाॅ.विधानचंद्र राॅय प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र कृषी दिनाच्या व डॉक्टर सेवा दिनाच्या म्हणाले की

राष्ट्रीय डॉक्टर दिन भारतात दरवर्षी १ जुलै रोजी महान चिकित्सक, शिक्षणतज्ज्ञ डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या जन्मदिन आणि स्मृतिदिनाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. डॉक्टर हे समाजाचे आरोग्यरक्षक असतात. ते रुग्णांचे आजार ओळखून योग्य उपचार करतात आणि आपल्याला निरोगी जीवन जगण्यास मदत करतात.तसेच महामारी आणि कोरोना संकटाच्या काळात डॉक्टरांचे योगदान अत्यंत मोलाचे आहेत महामारीच्या काळात डॉक्टरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा केली. त्यामुळे समाजात डॉक्टरांविषयी आदर आणि कृतज्ञतेची भावना अधिक दृढ झाली.राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे उद्दिष्ट महामित्र दत्ता वायचळे यांनी डाॅ विजय लोहारकर व डाॅ.आर टी जाधव यांच्या ग्रंथ व गुलाब पुष्प देऊन त्यांचा कार्याचा गौरव केले
त्यांच्या सेवांबद्दल कृतज्ञता व्यक्त केले डॉ. विजय लोहारकर यांनी राष्ट्रीय डॉ दिनाच्या विषय आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की बिधान चंद्र रॉय हे एक महान भारतीय चिकित्सक, स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होते त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानामुळे भारतामध्ये १ जुलै हा त्यांचा जन्म आणि स्मृतिदिन ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ म्हणून साजरा केला जातो असे म्हणाले शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते डॉक्टर आरती जाधव यांनी कृषी दिना विषयी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की
भारतीय कृषीसंस्कृतीला उजाळा देणाऱ्या ‘कृषी दिन’ या पावन पर्वाचे जनमाणसात अनन्यसाधारण असे महत्त्व असून थेट बांधावर-शेत शिवारातही मोठ्या प्रमाणात ‘कृषी दिवस’ साजरा होत असल्याने या पर्वाला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे. शेती व शेतकऱ्यांवरील निर्व्याज प्रेम आणि कृतज्ञता म्हणून ‘ साजरा करण्याची अभिनव मोहीम आज ही संकल्पना एक प्रथा म्हणून नावारूपाला आली. असे म्हणाले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मुठे यांनी केले व प्रास्ताविक डाॅ.आर टी.जाधव यांनी केले तर आभार प्रकाश माळी यांनी मानले
यावेळी उपस्थित महामित्र दत्ता वायचळे डॉ. विजय लोहारकर डाॅ. आर टीजाधव आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे प्रकाश माळी मनोज माळी धनंजय परदेशी सोमनाथ लोहारकर राजेंद्र देशमुख राजेंद्र सातपुते गणेश लोखंडे आदी उपस्थित होते

