
लोहोणेर येथील जनता विद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण करताना मुख्याध्यापक जिभाऊ शिर्के, पर्यवेक्षक विलास निकम,उपस्थित शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक. (छाया : सुनिल एखंडे)*
लोहोणेर-(प्रतिनिधी):येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात १ जुलै कृषी दिन उत्साहपूर्ण वातावरणात वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.शेती,पर्यावरण आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांसह समाजापर्यंत पोहोचावे या उद्देशाने विद्यालय परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे शिल्पकार स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक जिभाऊ शिर्के, पर्यवेक्षक विलास निकम, शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांच्या हस्ते विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणाबरोबरच प्रत्येकाने लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्पही करण्यात आला.शेती समृद्धीचा धागा, शेतकरी देशाचा भाग्य! आणि “एक वृक्ष… अनेक श्वास… आज लावा,उद्याचे जग वाचवा!हा संदेश देत वृक्षसंवर्धनाची सामूहिक शपथ घेण्यात आली.सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे कृषी दिनाचा हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करणारा आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा ठरला.

