
नाशिक (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोणवाडे येथे ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या (SMC) अध्यक्षा सौ. अर्चना अहेरवाड मॅडम होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्याध्यापक कौतिक तुकाराम खुटे सर तसेच सारिका निलेदार मॅडम यांची उपस्थिती होती.यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा परिधान करून तारपा नृत्य सादर केले. तसेच वारली चित्रकला प्रदर्शन भरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कला व संस्कृतीचे सुंदर दर्शन घडविले.यावेळी सारिका निलेदार मॅडम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “आदिवासी हे निसर्गाचे रक्षक आहेत.” तर मुख्याध्यापक कौतिक खुटे सर यांनी “जल-जंगल-जमीन जपूया” असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. आदिवासी संस्कृती, परंपरा आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

