
मूळडोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक (प्रतिनिधी ): सरस्वती माध्यमिक विद्यालय, मूळडोंगरी येथे ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस आदिवासी समाजाच्या महान परंपरा, संस्कृती, कला, रूढी-परंपरा व स्वातंत्र्यलढ्यातील योगदान याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आदिवासी समाज हा निसर्गाशी एकरूप होऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा समाज असून, त्यांच्या समृद्ध संस्कृतीचे जतन करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी वेशभूषा, पारंपरिक कला, नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी “आदिवासी संस्कृतीचा सन्मान – निसर्ग संवर्धनाचा संदेश” असा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आदिवासी समाजाविषयी आदर, बंधुभाव आणि सामाजिक समतेची भावना निर्माण झाली.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी केले.

