
लासलगाव (प्रतिनिधी ) दिनांक २६ जून ज्यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणूनही साजरा करण्यात येतो असे सामाजिक लोकशाहीचे प्रणेते, आरक्षणाचे जनक, लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२व्या जयंती निमित्त येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे आणि विद्यार्थी यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे आणि रा.से.यो. स्वयंसेवकांनी परीश्रम घेतले.

