
या कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न बोधिसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्य पुतळ्यास व छ.राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच समाजातील उच्च वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे म्हणाले
प्रा.प्रभाकर चतुर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळअस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांंसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असे ही उपक्रम त्यांनी राबवले. आशा महान राजास विनम्र अभिवादन
यावेळी धम्मपाल शिरसाठ यांनी सामुदायिक बुद्ध वंदना घेतली
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा प्रभाकर चतुर यांनी केले व प्रास्तविक आर्यन जाधव यांनी केले तर आभार प्रभाकर जाधव यांनी मानले
यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित महामित्र दत्ता वायचळे नगरसेविका शोभाताई जाधव, मा.नगरसेवक प्रभाकर जाधव प्रा. प्रभाकर चतुर, धम्मपाल शिरसाठ आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे, विजय जाधव,आर्यन जाधव, राजेंद्र दिवे, अशोक भालेराव, सुनिता जाधव, पोपटराव चव्हाण,लक्ष्मण मस्के,मिलिंद साळवे,प्रभाकर जाधव, श्रावण गायकवाड, आदि उपस्थित होते


