
देशभक्तीचा उत्साह, विद्यार्थ्यांचा जल्लोष आणि तिरंग्याचा अभिमान अशा उत्साहपूर्ण वातावरणात जिल्हा परिषद शाळा सुंदरपूर येथे ८० वा स्वातंत्र्य दिन मा . सरपंच तथा प्रशासक सौ.प्रतिक्षा विजय सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळी प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर समाजमंदिर येथील ध्वजारोहण उपसरपंच श्री. लहानुभाऊ साळवे यांच्या हस्ते, ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण भूमिपुत्र व प्रसिद्ध कवी श्री.राजेंद्र बाळासाहेब सोमवंशी सर यांच्या हस्ते पार पडले.
विविध सहकारी सोसायटी चे ध्वजारोहण चेअरमन श्री. रावसाहेब सोमवंशी यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुंदरपुरचे ध्वजारोहण अध्यक्ष श्री.अनिल सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेली सुंदर संगीत कवायत सर्वांचे आकर्षण ठरली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमास उपस्थित पाहुणे सुंदरपूरचे भूमिपुत्र, सुप्रसिद्ध कवी व बालसाहित्यिक श्री. राजेंद्र सोमवंशी यांच्या दोन कविता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात तर गोवा राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात एक कविता समाविष्ट करण्यात आल्यामुळे त्यांचा ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा व विविध कार्यकारी सोसायटी यांच्यामार्फत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित असा सत्कार करण्यात आला.
तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. शिवाजीराव ढेपले यांचाही ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच माणकेश्वर वाचनालयाचे नवनियुक्त सचिव श्री. सुनीलभाऊ चिखले यांचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी क्रिकेट क्लब सुंदरपुर च्या युवाशक्तीने एक आदर्श म्हणून सर्व विद्यार्थ्यांना वह्या, पेन, बिस्कीट, चॉकलेट चे वाटप केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कवी श्री राजेंद्र सोमवंशी , लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सामाजिक कार्यकर्ते श्री.शिवाजी ढेपले, माणकेश्वर वाचनालयाचे नवनियुक्त सचिव श्री.सुनील चिखले , पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री.सागर निकाळे तसेच सर्व प्रतिष्ठित मान्यवर ,पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य,देशप्रेमी नागरिक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ, सर्व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी माजी सरपंच तथा शालेय समितीचे शिक्षणतज्ञ श्री.राजेंद्र सोमवंशी यांनी सर्वांचे आभार मानले सर्व कार्यक्रम अतिशय सुंदर, शिस्तबद्ध आणि देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

