
जेष्ठ सभासद आणि हित चिंतक डॉ. प्रतिभा धोपावकर आणि निशिकांत राजेबहाद्दर यांच्या हस्ते झेंडावंदन.
नाशिक दिनांक १६ ऑगस्ट : यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने भारताचा ८० वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यशवंत व्यायाम शाळेचे जेष्ठ सभासद आणि हित चिंतक डॉ. प्रतिभा धोपावकर आणि निशिकांत राजेबहाद्दर यांच्या हस्ते ध्वज फडकावण्यात आला. यावेळी यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष रघुनाथ महाबळ, कार्यकारिणी सदस्य अविनाश पाटील, डॉ. जयराम महाबळ, डॉ. सदाशिव गोसावी, विजय खरोटे, प्रशांत गायकवाड, उमेश कर्पे, आनंद खरे, देणगीदार उमेश राठी, प्रदीप मोडक, आनंद खरे आणि यशवंत व्यायाम शाळेचे जेष्ठ सभासद, खेळाडू, प्रशिक्षक मोट्या संख्येने उपस्थित होते. व्यायाम शाळेला दहा लाख देणगी देणारे डॉ. प्रकाश जोशी आणि त्यांच्या पत्नी डॉ. ललिता जोशी तब्येत बरी नसल्यामुळे हजर राहू शकले नाही.

या ८० वा स्वतंत्र दिनानिमित्त व्यायाम शाळेचे जेष्ठ सभासद संजय धोपावकर आणि सौ. प्रतिभा धोपावकर यांच्या तर्फे एक्कावन्न हजार रुपये देणगी देण्यात आली. तसेच व्यायामशाळेचे जिम्नॅस्टिक्सचे ज्येष्ठ खेळाडू उमेश पाडेकर यांच्यावतीने त्यांचे वडील उदय पाडेकर आणि आई उषा पाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त पाच हजार रुपये देणगी देण्यात आले.
संस्थेच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.

