
नांदगाव ( प्रतिनिधी )ग्रामीण विकास शिक्षण संस्था नाशिक संचलित श्री सिद्धिविनायक बी एड कॉलेज नांदगाव चे प्राचार्य प्रा. विक्रम घुगे सर यांना “महर्षी वेदव्यास राष्ट्रीय गुरु गौरव पुरस्कार प्रदान” करण्यात आला.
नैसर्गिक मानवधिकारी सुरक्षा परिषद फोरम समिती नंदुरबार यांच्यातर्फे सन २०२६-२७ चे आरोग्यदूत, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना रविवार दिनांक – १६ ऑगस्ट २०२६ रोजी नंदुरबार येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात महर्षी वेदव्यास राष्ट्रीय गुरु गौरव पुरस्कार नांदगाव येथील ग्रामीण विकास शिक्षण संस्था नाशिक संचलित श्री सिद्धिविनायक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विक्रम घुगे सर यांना नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा समिती फोरम चे संचालक डॉ. गोरख देवरे साहेब यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आले, यावेळी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई चे अधिव्याख्याता डॉ.राकेश रामराजे सर, अक्कलकुवा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.ज्योती लष्करी मॅडम तसेच व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित होते,

