
सिन्नर प्रतिनिधी(सोमनाथ गिरी ):- डुबेरे येथील जनता माध्यमिक व माध्यमिक विद्यालयात
अग्निवीर व पोलीस पदी निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला असून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
अमोल वाजे ,ललित वारुंगसे ,दत्ता वारुंगसे, प्रसाद वाजे, वैभव वाजे ,संकेत पावसे, रोशन वारुंगसे, आदित्य ढोली, यांची अग्नीवीर पदी निवड झाल्याबद्दल तर पूजा वाजे, प्राजक्ता वाजे यांची पोलीस दलात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. मराठा विद्या प्रसारक समाज संस्था सरचिटणीस नितीनजी ठाकरे, तालुका संचालक कृष्णाजी भगत,शालेय समितीचे अध्यक्ष नारायण वाजे, उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल वामने , प्राचार्य रामदास वाजे, सरपंच रामनाथ पावशे, तंटामुक्त समिती अध्यक्ष कारभारी वारुंगसे, पोलीस पाटील रामदास वारुंगसे,
यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यासात अग्रेसर राहिले तर यश निश्चित मिळते यासाठी सराव, सातत्य ठेवणे गरजेचे असल्याचे मत यावेळी प्राचार्य रामदास वाजे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील ससाने, मारुती डगळे,रेखा खंडीझोड, कचेश्वर शिंदे, किशोर शिंदे, रवींद्र गोजरे यांनी परिश्रम घेतले.

