
नांदगाव (प्रतिनिधी )वुक्षारोपन काळाची गरज मंत्री श्री.जयकुमार भाऊ रावल यांच प्रतिपादन दोंडाईचा येथे निसर्ग मित्र समिती आयोजित कै.दादाजी सुधाकरजी बोरसे यांच्या स्मरणार्थ निसर्ग मित्र समिती आयोजित राष्ट्रीय आयकान अवार्ड 2026 हस्ती भवन शहादा रोड दोंडाईचा येथे महाराष्टातील निसर्ग वनीकरण वुक्षारोपन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था व्यक्ती यांचा राष्ट्रीय राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.यात नासिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील आश्रमशाळा सारतळे येथील उच्चमाध्यमिक शिक्षक व निसर्ग मित्र समिती नांदगाव तालुका अध्यक्ष प्रा.धिरज मधुकरसिंह परमार यांना जयंतकुमार भाऊ रावल हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी मंत्री जयकुमार भाऊ रावल अध्यक्ष स्थानी बोलताना सध्याची नौसर्गिक स्थिती बघता वुक्षारोपण करुण वुक्ष वाढविणे काळजी गरज असल्याचे प्रतिपादन मंत्री श्री.जयकुमार भाऊ रावल यांनी व्यक्त केले. कार्यक्राचे आयोजन डॉ. प्रेमकुमार अहिरे,श्री.डी.आर.पाटील संतोष राव पाटील, डी. बी. पाटील यांनी केले होते या श्री.परमार सर समवेत मुख्याध्यापक श्री समाधान चौधरी सर श्री दिलीप सौंदाणे सागर पाठक आदि यावेळी उपस्थित होते श्री धिरज मधुकरसिंह परमार सर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सरचिटणीस आप्पासाहेब पगार कोषाध्यक्ष नर्मताताई पगार अध्यक्ष दर्शन दादा पगार, संस्थेच्या मार्गदर्शिकारचनाताई पगार यांनी अभिनंदन केले आहे.

