
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३६९ वा दिवस

*'अविज्ञातं विजानताम्'* आपण जाणतो असे ज्याला वाटते तो जाणत नाही. *'विज्ञातारम् अरे केन विजानीयात्'* जो स्वयं ज्ञातृस्वरूप आहे, त्याला कोण जाणू शकणार? दोन वस्तू आहेत. पहिली म्हणजे ब्रह्म, आणि दुसरी म्हणजे जगत. पैकी ब्रह्म हे अपरिणामी, अपरिवर्तनशील वा कदापि न बदलणारे आहे, आणि जग सदा बदलते आहे. जग अनादी काळापासून अस्तित्वात आहे आणि अनंत काळ अस्तित्वात राहील. एका अर्थाने तेही अनादी-अनंत वा नित्यविद्यमान आहे. ज्यात किती बदल घडतात हे तुम्हाला आकळता येत नाही त्यालाच तर तुम्ही अनंत वा नित्य म्हणत असता. जगत आणि ब्रह्म ही दोन्ही एकच आहेत खरी, परंतु एकाच वेळी तुम्ही ती दोन्ही जाणू शकत नाही. कल्पना करा की एका दगडावर एक चित्र कोरले आहे; ज्या वेळी तुमचे त्या कोरीवकामाकडे लक्ष जाते त्या वेळी त्या दगडाकडे लक्ष जात नाही आणि ज्यावेळी त्या दगडाकडे तुमचे लक्ष जाते त्यावेळी कोरलेल्या भागाकडे तुमचे लक्ष जात नाही. दोघांची तुम्हाला एकाच वेळी जाणीव होत नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर श्रावण ३० शके १९४८
★ श्रावण शुध्द /शुक्ल ९
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ शुक्रवार दि. २१ ऑगस्ट २०२६
★ १९३१ संगीततज्ञ, गायक, संगीतप्रसारक, गंधर्व महाविद्यालयाचे संस्थापक, गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचा स्मृतिदिन.
★ महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिन.
★ १९८१ गांधीवादी नेते, देशभक्त, समाजसुधारक, इतिहासकार, बहुभाषा कोविद आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा काकासाहेब कालेलकर यांचा स्मृतिदिन.

