
नाशिकरोड( प्रतिनिधी):- येथील शिखरेवाडीतील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सभागृहात इंदिरानगर येथील कृतार्थ ज्येष्ठ संस्थेच्या सभासदांनी सादर केलेले ‘सख्खे शेजारी’ हे अभिवाचन रंगले.
स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या सभागृहात संजय देशपांडे, गीता पोळ, मुलगी साधना भुरे हे एक कुटुंब आणि त्यांचे सख्खे शेजारी शिरीष भालेराव, प्रतिभा कुलकर्णी, मुलगा प्रवीण कुमार गीत तसेच कुटुंबीय या दोन परिवाराच्या दैनंदिन जीवनातील भावभावनांचे, एकमेकांमधील वैचारिक देवाण-घेवाण यांचे सुरेख सादरीकरण कलाकारांनी अतिशय सुंदर रीतीने केले.
सदर कार्यक्रमाचे लेखन आणि दिग्दर्शन शरद तिळवणकर यांनी केले. अभिवाचनास मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या स्वानंदच्या सभासदांनी उस्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाची सुरुवात वैजयंती चंद्रात्रे यांनी केलेल्या त्रिवार ओंकार आणि गुरुवंदनेने झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव अविनाश गोसावी, उपखजिनदार परमेश्वर चिंतकिंदी, उपखजिनदार शरद वैद्य, रवींद्र चंद्रात्रे, प्रा.प्रल्हाद वकारे, सतीश चितळे, अविनाश कुलकर्णी, होनराव, दिलीप भिंगारकर, जयंत जोशी, अनिल सहस्त्रबुद्धे, ज्योत्स्ना सहस्त्रबुद्धे, ज्योती जोशी, लिमये, दीपाली भिंगारकर, कल्पना वैद्य यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाध्यक्षा सुनंदा गोसावी यांनी कलाकारांचे कौतुक करत, अतिशय सुंदर रीतीने सादरीकरण केल्याबद्दल कौतुक केले. सूत्रसंचालन रेखा नाशिककर यांनी केले तर कार्यक्रमाचे निवेदन आणि आभार वैजयंती डांगे यांनी मानले.

