
नाशिक (प्रतिनिधी )क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे ,अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नाशिक मार्फत आयोजित १९ वर्षाआतील मुली जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धा,नाशिक २०२६-२७ स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्टेडियम,पंचवटी ता.जि.नाशिक येथे पार पडल्या…..
यामध्ये वाय.डी.बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,नाशिक या १९ वर्षाआतील जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला , संघाची पुढील विभागीय खो-खो स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सुनिता बाजपेयी मॅडम,उपमुख्याध्यापक सौ.शगुफ्ता शेख मॅडम व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक श्री .मिलिंद कोठावदे सर,अधिक्षिका सौ.मीना वाळूंजे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री.कैलास बागुल सर,सौ.ऋतुजा नाशिककर मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले.
त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री प्रकाशजी वैशंपायन साहेब,उपाध्यक्ष मा.श्री प्रभाकर कुलकर्णी ,सेक्रेटरी तथा पर्यवेक्षक मा.श्री हेमंत बरकले सर,शालेय समिती चेअरमन मा.श्री रमेश महाशब्दे ,यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे व त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सुनिता बाजपेयी मॅडम,अधिक्षिका मा.सौ.मीना वाळूंजे मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ.शगुफ्ता शेख मॅडम व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक मा.श्री मिलिंद कोठावदे सर,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री कैलास बागुल सर,सौ.भारती चंद्रात्रे मॅडम,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विजयी संघाचे,मार्गदर्शक शिक्षक व सहभागी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

