
नांदगाव (प्रतिनिधी)नांदगाव तालुक्यातील परधाडी गावातील सलून व्यवसायिक शिवाजी चित्ते यांच्या सलून दुकानांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाली होती. सर्वसाधारण परिस्थिती असलेले चित्ते यांच्या दुकानात झालेल्या जळीत घटनेची माहिती आमदार सुहास अण्णा कांदे यांना समाज बांधवांनी कळविले असता आज नांदगाव येथील आमदार निवासस्थानी त्यांना सन्मानपूर्वक आमंत्रित करून त्यांना सलून दुकानातील सर्व साहित्य भेट देण्यात आले.

याप्रसंगी नांदगाव शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर भाऊ हिरे, नाभिक संघाचे तालुकाप्रमुख विजय निकम सर नांदगाव शहर प्रमुख रवींद्र बिडवे सतीश बिडवे दीपक झुंजारराव नरेंद्र निकम बापू देसाई सचिन बिडवे जिभाऊ सोनवणे निलेश मोरे साईनाथ बोरसे अविनाश बोरसे तसेच समाज बांधव उपस्थित होते
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

