
राज्य शासनाच्या अन्न व औषध विभागाचेच आयुक्त श्री.तुकाराम मुंडे साहेब यांची भेट घेण्यासाठी संघटनांच्या वतीने वेळ मागितला असून लवकरच त्यांना शिष्टमंडळ निवेदन देणार असल्याचे शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण यांनी सांगितले
पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी 27 जुलै 2026 रोजी काढलेले परिपत्रक व त्याला अनुसरून शिक्षण संचालक प्राथमिक यांनी 13 ऑगस्ट रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार शालेय व्यवस्थापन समितीचे सचिव व मुख्याध्यापक यांना नोंदणी करण्यास सांगितले आहे.

राज्य शासनाच्या धोरणानुसार पोषण आहारासाठी सर्व शिधा आणि धान्य पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांची नियुक्ती शासन करत असते, शासनाच्या धोरणानुसार तो बचत गटाकडून शिजवून घेतला जातो आणि वाटपाचे काम शाळेमध्ये असतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुख्याध्यापकाची भूमिका मध्यस्थीची असताना त्यांना या नोंदणी मध्ये गुंतवून शासनाने त्यांचे मूळ कामापासून त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे, या परिपत्रकांचा सर्व संघटनांनी निषेध केला असून मुख्याध्यापकांना नोंदणी करण्याचे बंधनातून मुक्त करण्याबाबतची निवेदन आज नाशिक जिल्ह्यातून सर्व संघटनांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी श्री.राजपूत साहेब यांना देण्यात आले यावेळी उत्तर महाराष्ट्र शिक्षकसेनेचे अध्यक्ष संजय चव्हाण ,जिल्हाध्यक्ष मधुकर वाघ ,महानगर अध्यक्ष सुरेश घरटे ,कार्याध्यक्ष पैलवान प्रवीण पाळदे , प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र सोमवंशी, टीडीएफचे जिल्हा कार्यवाह अरुण पवार, उपाध्यक्ष बाळासाहेब ढोबळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गोरख कुणगर ,शिक्षक परिषदेचे कार्यवाह विजय बडे, राजेंद्र काकुळते, कांगणेसर ,एस.टी.चव्हाण सर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

