
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३७५ वा दिवस
आत्म्याची जास्त प्रमाणात अभिव्यक्ती म्हणजेच 'चांगले' वा 'शुभ' आणि कमी प्रमाणात अभिव्यक्ती म्हणजेच 'वाईट' वा 'अशुभ' होय. लहानपणी चांगल्या वाटणाऱ्या कितीतरी गोष्टी खरोखर वाईट असतात आणि वाईट वाटणाऱ्या कितीतरी गोष्टी खरोखर चांगल्या असतात ! आपले विचार कसे बदलत जातात! आपले विचार कसे अधिकाधिक उच्च होत जातात! एकेकाळी जे आपण खूप चांगले समजत होतो तेच आता तितके चांगले वाटत नाही. याप्रमाणे चांगले व वाईट ही आपल्या मनाच्या विकासावर अवलंबून आहेत, त्यांचे बाहेर कुठे अस्तित्व नाही. त्यांच्यात केवळ प्रमाणाचा फरक आहे. सर्वकाही आत्म्याचीच अभिव्यक्ती आहे. आत्मा सगळ्या वस्तूंमधून प्रकट होत असतो.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास ५ शके १९४८
★ श्रावण शुध्द /शुक्ल १४
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ गुरुवार दि. २७ ऑगस्ट २०२६
★ नारळी पौर्णिमा
★ १८५४ प्रख्यात कायदेपंडित, विद्वान, राजकीय नेते, लोकमान्य टिळकांचे सहकारी ‘वर्हाडचे नवाब’ गणेश श्रीकृष्ण तथा दादासाहेब खापर्डे यांचा जन्मदिन.
★ १९७६ आपल्या तीस वर्षाच्या कारकीर्दीत दहा हजाराहून अधिक गीतांना आवाज देणारे पार्श्वगायक मुकेश चंद्र माथुर यांचा स्मृतिदिन.

