
खो खो च्या संघासमवेत मुख्याध्यापक श्री जे एम थोरात
क्रीडा शिक्षक श्री बी के देवरे अधीक्षक श्री नितानकर आदी.
ढेकू (प्रतिनिधी) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यामार्फत सन २०२६-२७ मध्ये झालेल्या तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धांमध्ये १७वर्षाखालील वयोगटाच्या खो-खो खेळातील ढेकू माध्यमिक आश्रम शाळेचा संघ तालुक्यात प्रथम क्रमांकावर आला.
त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली .
संघाची जबाबदारी कर्णधार शैलेश लक्ष्मण राठोड याने पार पाडली तर त्यासोबत निलेश राठोड ,मुकुंद राठोड ,मुकेश राठोड ,श्याम राठोड ,शिवम चव्हाण ,संदेश चव्हाण ,मिथुन चव्हाण ,सुदर्शन चव्हाण ,रोहित पवार यांनी खेळात सहभागी नोंदवला
त्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री जे एम थोरात यांच्यासह क्रीडा शिक्षक श्री बी के देवरे श्री एस एम कामडी श्री आर बी चव्हाण श्री आर जी धाकतोडे अधीक्षक श्री नितानकर नितीन यांचे मार्गदर्शन लाभले .
सर्व खेळाडू व खो-खोच्या संघाला ग्रामोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक व सरचिटणीस माननीय श्री कृष्णरावजी नेरे (सर )ग्रामोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा श्री योगेशजी हिरे तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक माननीय श्री संतोषजी चव्हाण साहेब आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या


