
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर, नाशिक येथे मुख्याध्यापक राजेंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक पद्धतीने रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध साहित्यापासून सुंदर राख्या तयार केल्या. त्यानंतर विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गातील बहिणींना शैक्षणिक साहित्य भेट देत रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित केला.
याचबरोबर परिवहन समितीतील रिक्षाचालक तसेच शाळेतील सुरक्षा रक्षकांना विद्यार्थिनींनी राख्या बांधून कृतज्ञता व्यक्त केली. तसेच वृक्षाला राखी बांधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा रक्षाबंधन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी सूत्रप्रमुख मनीषा जोशी, सांस्कृतिक विभागप्रमुख प्राजक्ता क्षीरसागर, उषा जोपळे, स्वाती महाजन, हर्षल कोठावदे, प्रशांत केंदळे, दिपाली पाटील, कल्पना जोपळे आदी उपस्थित होते.

