
डाॅ.श्यामसुंदर झळके
सिन्नर (प्रतिनिधी)
येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्यामसुंदर झळके यांना कोपरगाव येथील बी द चेंज फाऊंडेशन संस्थेतर्फे ” महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६” पुरस्कार जाहीर झाला आहे.त्यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या विविधांगी कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.गेल्या ४० वर्षांपासून डॉ.झळके सामाजिक,वैद्यकीय तसेच साहित्य,पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,ग्राहक पंचायत महाराष्ट्र, प्रवासी महासंघ,महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या माध्यमातून ते समाज प्रबोधन करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.त्यांना या अगोदर विविध क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पुरस्कार वितरण सोहळा शिर्डी येथे रविवार दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी,साई पालखी निवारा येथे होणार आहे.

