
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ओझरच्या एचएएल कंपनीत अधिकारी म्हणून प्रदीर्घकाळ नोकरी केली. या काळात उत्तम रसिकवाचक म्हणून अनेक ग्रंथांचा संग्रह केला. तसेच शालेय जीवन आणि नोकरी या काळात एक-एक रुपया वाचवून अनेक वस्तू विकत घेतल्या. या वस्तू आणि अनमोल ग्रंथभांडार कुठेतरी पडून राहण्यापेक्षा ते गरजूंपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याची जाणीव झाल्याने एचएएलमधील सेवानिवृत्त अधिकारी आणि शिखरेवाडी परिसरातील सदैव हसतमुख असलेले ज्येष्ठ नागरिक आणि श्री बालाजी देवस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त _आदरणीय सुरेश दुर्गा बाबुलाल जयस्वाल_ यांनी आपल्याकडील सुमारे ७३ वाचनीय ग्रंथांसारखा अनमोल खजिना, टेबल लॅम्प, टेबल, खुर्ची आणि शैक्षणिक साहित्य ‘दातृत्वाचा ज्ञानयज्ञ’ उपक्रम राबवणाऱ्या पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयाच्या गरजू विद्यार्थ्यांसाठी सुपूर्द करत दातृत्वाचा अनोखा वसा आणि वारसा जपला. हा खजिना सुपूर्द करताना जुन्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. ‘ये हृदयीचे ते हृदयी…’ संवाद साधला. मित्रत्वाचे नाते जपत मानव्याची पायाभरणी केली. धन्यवाद _जयस्वाल सर._ या उपक्रमासाठी शिखरेवाडीतील उपक्रमशील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेचे उपाध्यक्ष आणि शासकीय तंत्रनिकेतनचे सेवानिवृत्त प्राध्यापक _आदरणीय रवींद्र चंद्रात्रे सर_ यांचे बहुमोल सहकार्य लाभले त्यांचेही मनापासून आभार…!!!

