
सिन्नर (: प्रतिनिधी ) सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघ व आर. एम. ड्रीप कंपनी, सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार सोहळ्याचे २२ वे वर्ष साजरे करण्यात येणार आहे. सन २०२६-२७ मधील हा पुरस्कार सोहळा शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता मातोश्री चांडक कन्या विद्यालय, सिन्नर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यास दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कराव भगरे, नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे, नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सत्यजितदादा तांबे, शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग संजयकुमार राठोड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. नाशिक प्रशांत दिग्रसकर तसेच गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सिन्नर राजेश डामसे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यामागील मुख्य उद्देश सिन्नर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे हा आहे. पुरस्काराच्या माध्यमातून शिक्षकांना प्रेरणा मिळावी, शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने वाढ व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, या हेतूने गेल्या २२ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.
आजवर सिन्नर तालुक्यातील जवळपास ४५० ते ५०० मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या उपक्रमामुळे सिन्नर तालुका शैक्षणिक, ज्ञान, गुणवत्ता तसेच क्रीडा क्षेत्रात नाशिक जिल्ह्यात आघाडीवर राहण्यास प्रेरणा मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यांचा होणार पुरस्काराने गौरव
आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार


१. श्री. एल. डी. बेणके — अध्यक्ष, सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघ व उपाध्यक्ष, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ; मुख्याध्यापक, गोपाल विद्यालय, पिंपळे.
२. श्री. राम ढोली — मुख्याध्यापक, शं. वा. वाजे विद्यालय, सिन्नर.
३. श्री. बी. ए. कलकत्ते — प्राचार्य, जनता विद्यालय, नायगाव.
४. श्री. एस. टी. आव्हाड — मुख्याध्यापक, टी. एस. दिघोळे विद्यालय, नायगाव.
५. श्री. आर. टी. गिरी — मुख्याध्यापक, पातळेश्वर माध्यमिक विद्यालय, पाडळी.
६. श्री. नंदराम पांडुरंग काकड — मुख्याध्यापक, श्री सिद्धकपिलेश्वर माध्यमिक विद्यालय, खंबाळे.
७. सौ. सविता फड — मुख्याध्यापिका, श्रीमती पुष्पावती देशमुख नवजीवन डे स्कूल, सिन्नर.
८. श्री. उदय शोभा चिंधु कुदळे — मुख्याध्यापक, एस. जी. पब्लिक स्कूल, सिन्नर.
९. श्री. विजय लक्ष्मण खरे — मुख्याध्यापक, रामनगर आश्रमशाळा, रामनगर.
१०. श्रीमती वर्षा सोपान पावसे — मुख्याध्यापिका, डी. के. तांबे विद्यालय, गोंदे.
आदर्श प्राध्यापक पुरस्कार
१. प्रा. श्री. पी. एम. खैरनार — सिन्नर तालुका क्रीडा संयोजक, ज्युनिअर कॉलेज, सिन्नर.
२. प्रा. श्री. राहुल चंद्रकांत वरंदळ — संस्था शिक्षणाधिकारी, सगर विद्या प्रसारक संस्था.
आदर्श शिक्षक पुरस्कार
१. श्री. संदीप बाबुराव सोनवणे — जोगेश्वरी आश्रमशाळा, पाटोळे.
२. श्री. दिलीप मोहनराव काकड — न्यू इंग्लिश स्कूल, भोकणी.
३. श्रीमती वैशाली पाटील — पाथरे हायस्कूल, पाथरे.
४. श्रीमती प्रिया विनोद कुलकर्णी — चांडक कन्या विद्यालय, सिन्नर.
५. श्री. सुनील चंद्रभान खैरनार — नूतन जवाहर विद्यालय, मनेगाव.
६. श्री. राजू शंकर नागरे — नूतन विद्यालय, वावी — क्रीडा.
७. श्री. दत्तात्रय बाळकृष्ण रेवगडे — एस. एस. एस. विद्यालय, गुळवंच — (क्रीडा.)
८. श्री. बी. आर. सानप — भोजापूर खोरे हायस्कूल, चास.
९. श्री. राजेंद्र सुरेश गिते — न्यू इंग्लिश स्कूल, वडांगळी —( क्रीडा.)
१०. श्रीमती जयश्री जगन्नाथ सांगळे — भिकुसा सानप हायस्कूल, सिन्नर.
११. श्रीमती शोभा दशरथ साबळे — ब्रह्मानंद इंग्लिश स्कूल, दोडी.
१२. श्रीमती पायल दत्तात्रय औताडे — एस. डी. जाधव इंग्लिश मीडियम स्कूल, शहा.
१३. श्रीमती राधाबाई शंकर एखंडे — वाजे शिवछत्रपती शिवाजी विद्यालय, धोंडवार.
१४. श्रीमती पल्लवी सखाराम बच्छाव — व. ना. सारडा विद्यालय, सिन्नर.
आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार
१. श्रीमती राणी वसंत शिंदे — वरिष्ठ लिपिक, जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, डुबेरे.
२. श्री. प्रमोद विठ्ठल वान्हेरे — शिपाई, न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बारागाव पिंप्री.
विशेष पुरस्कार
सौ.लताताई पवार या. मुख्याध्यापिका- श्री माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर सिन्नर
आदर्श जीवन गौरव पुरस्कार :
आदर्श शिक्षण संस्था चालक पुरस्कार :
श्री. एस. बी. देशमुख — सेक्रेटरी, बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था, सिन्नर.
शैक्षणिक गुणवत्तेची चळवळ अधिक बळकट करण्याचा संकल्प
या पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रक म्हणून श्री. एस. बी. देशमुख, सचिव, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ; श्री. एल. डी. बेणके, मुख्याध्यापक, गोपाल विद्यालय, पिंपळे; श्री. पांडे बी. व्ही., अध्यक्ष, सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघ व उपाध्यक्ष, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ; श्री. अर्थव निवृत्ती केदार, संचालक, आर. एम.डी एम ड्रीप सिन्नर; श्री. एम. एन. देशमुख, कार्याध्यक्ष, सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघ श्री. एम. डी. काळे, सचिव, सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघ आदींचे मार्गदर्शन लाभत आहे.
या उपक्रमाला तालुक्यातील संस्था चालक, मुख्याध्यापक संघ, शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे सहकार्य लाभत आहे. दरवर्षी आपल्या आर्थिक नफ्यातून खारीचा वाटा उचलणारे व्यवसायिक, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्तेही या उपक्रमाला हातभार लावत असल्याने पुरस्कार सोहळ्याची परंपरा अधिक समृद्ध झाली आहे.
मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान करून त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढविणे आणि त्यातून विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण मिळावे, हीच या २२ वर्षांच्या पुरस्कार परंपरेची खरी प्रेरणा आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्याची ओळख गुणवंत, ज्ञानवंत, क्रीडाप्रेमी आणि उपक्रमशील तालुका म्हणून निर्माण होण्यात या सामूहिक प्रयत्नांचा मोठा वाटा असल्याचे आयोजकांनी नमूद केले.

