
नाशिक, दि. ४ सप्टेंबर २०२६ :
मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या कला, विज्ञान व
वाणिज्य महाविद्यालय, ओझर (मिग), नाशिक येथील भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने विज्ञान मंडळाच्या उद्घाटनानिमित्त राष्ट्रीय अंतराळ दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि संशोधनाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून KTHM महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे सहकारी प्रा. सागर निकम उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान, अंतराळ संशोधन आणि भारताच्या अंतराळ क्षेत्रातील प्रगतीविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. लोखंडे सर यांचे मार्गदर्शन लाभले. विज्ञान शाखा प्रमुख डॉ. डी. एस. बोराडे सर,भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. एन. भवरे मॅडम, IQAC समन्वयक डॉ. एम. डी. दुगजे सर आणि कला शाखा प्रमुख प्रा. आवारे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रांगोळी स्पर्धा, पोस्टर सादरीकरण स्पर्धा आणि Space Quest प्रश्नमंजुषा स्पर्धा यांचा विशेष समावेश होता. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे, वैज्ञानिक ज्ञानाचे आणि सर्जनशीलतेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
रांगोळी स्पर्धेसाठी प्रा. हर्षला बोरस्ते यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले, तर पोस्टर सादरीकरण स्पर्धेसाठी श्री. एस. बी. उगले यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
या कार्यक्रमाचे कार्यक्रम समन्वयक श्री. विशाल ससाणे होते. प्रा. अमृता वाघ यांनी Space Quest प्रश्नमंजुषा स्पर्धेचे नियोजन केले. प्रा. छाया सुतार यांनी पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन केले. प्रा. वर्षा शिंपणकर यांनी रांगोळी स्पर्धेचे आयोजन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी डॉ. एम. डी. ढिकले यांनी आभार प्रदर्शन करून प्रमुख अतिथी, प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी श्री.मत्सागर,श्री सतीश ढिकलेआणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा, सर्जनशीलता, संघभावना आणि अंतराळ विज्ञानाविषयी उत्सुकता निर्माण झाली. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.

