
लासलगाव, दि.७ सप्टेंबर ( ) नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (+२ स्तर) विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील प्रथम आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची 235 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ब्रिटिशांच्या जुलमी आणि अन्यायकारक सत्तेविरुद्ध शौर्याने सशस्त्र लढा उभारणारे, स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी अखेरपउर्यंत संघर्ष करणारे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक होते.
सर्वप्रथम क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारे व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील प्रथम आद्य क्रांतिकारक होते.
या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.सुनिल गायकर आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.सुनिल गायकर आणि सर्व रा.से.यो. स्वयंसेवकांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

