
लासलगाव-(प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने लासलगाव येथील अनाथ आश्रम मध्ये जाऊन तेथील अनाथ मुलांची संवाद साधत स्वयंसेवकांनी रक्षाबंधन केले. आश्रमातील जवळपास 80 मुलांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविकांनी राखी बांधली. तसेच मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. सामाजिक उपक्रमाची शिकवण देत असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने या रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले.

रक्षाबंधन कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी हिरीरीने सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सेक्रेटरी श्री. गोविंदराव होळकर व प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. एनएसएस चे कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रदीप सोनवणे, डॉ. संजय शिंदे तसेच स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले.

