
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३८८ वा दिवस

सदेव सोम्य इदमग्र आसीत् एकमेवाद्वितीयम्
छांदोग्य उपनिषदातील (अध्याय ६, खंड २, श्लोक १)
हे प्रिय श्वेतकेतू, हे जग निर्माण होण्यापूर्वी सुरुवातीला केवळ एकच ‘सत्’ परब्रह्म/परमेश्वर अस्तित्वात होते, जे एकटेच होते आणि ज्याच्यासारखे दुसरे काहीही नव्हते. सौम्यदर्शना, प्रारंभी हे सारे केवळ ते ‘सत्’ होते, आणखी काहीही अस्तित्वात नव्हते. जिथेजिथे सत्त्वगुण तिथेतिथे ज्ञान आढळून येते. यावरून हे मात्र सिद्ध होत नाही की सत्त्वच ज्ञानाच्या उत्पत्तीचे कारण होय. उलट, असे म्हणता येईल की, माणसाच्या आत ज्ञान आधीपासून आहे, तेच सत्त्वाच्या सान्निध्याने प्रकट होते, इतकेच काय ते. जसे, एखादा लोखंडी गोळा अग्नीजवळ ठेवल्यास, त्या गोळ्यात आधीपासूनच अव्यक्तस्वरूपात असलेले तेज प्रकटित करून तो अग्नी त्या गोळ्याला उष्ण करतो, स्वतः त्या गोळ्यात प्रवेश करून नव्हे.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर भाद्र नभस्यमास १८ शके १९४८
★ श्रावण वद्य /कृष्ण १३
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ बुधवार दि. ९ सप्टेंबर २०२६
★ १९४२ ब्रिटिश सरकारने हुतात्मा शिरीष कुमार यांच्यावर गोळी झाडली.
★ १९५० सुप्रसिध्द संगीतकार, गायक, श्रीधर सुधीर फडके यांचा जन्मदिन.
★ २०१२ भारतीय दुग्धउत्पादनातील “धवल क्रांतीचे जनक”, अमूलचे संस्थापक, पद्मविभूषण व्हर्गिस कुरियन यांचा स्मृतिदिन.

