
मालेगाव.(प्रतिनिधी),मालेगाव येथील सुप्रसिद्ध राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय कवी,लेखक,समीक्षक संजय मुकुंदराव निकम यांनी लिहिलेल्या जय माँ भारती या देश भक्तीने भारलेल्या बहू चर्चीत हिंदी कविता संग्रहाचे प्रकाशन जग विख्यात महानायक ज्युनियर अमिताभ बच्चन (श्री.अशोकजी पटणी )यांच्या शुभ हस्ते सॊमवार दि.14/9/2026 गणेश चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर मोठ्या उत्साहात करण्यात आले.हा कार्यक्रम बालाचंदन अपार्टमेंट,कॅम्प मालेगाव येथे संपन्न झाला.अध्यक्ष स्थानी ओमजी शर्मा होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाम सुंदर लखोटीया यांनी केलें.श्री.मनोज पवार यांनी उपस्थित श्रोत्यांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

