
नाशिक:( प्रतिनिधी ) मराठी साम्राज्याचा वारसा असलेल्या तंजावर भूमीत रंगणार ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन सोहळा.अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने येत्या २३सप्टेंबर २०२६ रोजी तंजावर (तामिळनाडू) येथे आयोजित व्दितीय सरफोजी मराठी साहित्य संमेलन होत आहे. छ.शहाजीराजे भोसले यांचे पुत्र व्यंकोजी राजे भोसले यांच्या राजघराण्यातील मराठी साम्राज्यातील तंजावर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून म.वि.प्र समाज नाशिकचे सेवानिवृत्त प्रबंधक व नाशिक जिल्ह्यातील जेष्ठ कवी माणिकराव गोडसे यांची निवड होऊन सहभागी होणार आहे.

संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक, जेष्ठ विचारवंत,बुध्द भुषण संस्कृत ग्रंथाचा मराठी काव्यानुवाद साकारणारे अ.भा.मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शरद गोरे, माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे हे संमेलनाध्यक्ष, मा.श्रीमंत छ.बाबाजीराजे भोसले उद्घाटक व मा श्रीमंत युवराज संभाजीराजे भोसले निमंत्रक आहे. ग्रंथदिंडी,परिसंवाद, कविसंमेलन व विविध क्षेत्रातील मान्यवरांना सरफोजीराजे साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

