केंद्रीय विद्यालय, होरायझन, टी. जे. चव्हाण , भोसला, पुरुषोत्तम, व्ही. एन. नाईक, बिटको संघांची विजयी सलामी.

नाशिक (प्रतिनिधी): यशवंत व्यायाम शाळेच्या वतीने दर वर्षीप्रमाणे दिनांक १६ ते १८ सप्टेंबर, २०२६ दरम्यान ३८ व्या खुल्या शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. या स्पर्धेचे उदघाटन यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय खेळाडू तथा प्रशिक्षक राजेंद्र शिंत्रे, विजय खरोटे, आनंद खरे, अविनाश खैरनार, प्रमोद जाधव, बाळासाहेब भडके आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना दीपक पाटील यांनी सांगितले की, खेळाडूंना चांगल्या प्रकारच्या सुविधा देणे आमचे काम आहे. त्या दृष्टीने खेळाडूंना सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. खेळाडूंनी या संधीचा फायदा घेऊन प्रगती करावी असे सांगितले.
या स्पर्धेत १४ वर्षे मुले आणि मुली, १७ वर्षे मुले आणि मुली आणि १९ वर्षे मुले आणि मुली अश्या तीन गटांचा समावेश आहे. हे या स्पर्धेचे ३८ वे वर्ष असून विविध गटातील खेळाडूंना स्पर्धेचा सराव मिळावा आणि या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंनी आपल्या खेळात प्रगती साधावी हा या स्पर्धा आयोजनामागील हेतू आहे. खेळाडूंना जास्तीत जास्त सामने खेळायला मिळावे यासाठी या स्पर्धा साखळी पद्दतीने खेळविले जात आहेत.या स्पर्धेत विविध गटांच्या एकूण ६३ संघांनी सहभाग नोंदवून चांगला प्रतिसाद दिला. यामध्ये मालेगांव, ओझर , एच. ए. एल., एकलहरे, घोटी, इगतपुरी, नाशिकरोड, मखमलाबाद यासह नाशिकच्या विविध संघांचा समावेश आहे.

उदघाटनानंतर विविध गटांच्या सामन्यांना सुरवात झाली. यामध्ये मुलांच्या गटात केंद्रीय विद्यालय, ओझर, पुरुषोत्तम, टी. जे. चव्हाण, आर. वाय. के, के.टी. एच. एम. तर मुलींमध्ये होरायझन, र, ज. बीटको, के. टी. एच. एम. संघांनी विजय मिळवत आपली विजयी सुरवात केली.
आज सर्व गटांच्या साखळी सामने खेळविले जाणार आहेत, तर उद्या सकाळच्या सत्रात उर्वरित साखळी सामने खेळविले जातील. त्यानंतर उद्या दुपारच्या सत्रात आणि दिनांक १८ रोजी सर्व गटांचे उपांत्य, आणि अंतिम सामने खेळविले जातील अशी माहिती आयोजकांनी दिली. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विजय खरोटे, आनंद खरे, अविनाश खैरनार यांच्या ,मार्गदर्शनाखाली यशवंत व्यायाम शाळेचे वरिष्ठ खेळाडू परिश्रम घेत आहेत.

आज झालेल्या सामन्याचे निकाल :-
१४ वर्षे मुले : १) केंद्रीय विद्यालय,ओझर विजयी विरुद्ध जनता विद्यालय, घोटी, २) टी. जे. चव्हाण विजयी विरुद्ध भोसला स्कुल. ३) पुरुषोत्तम स्कुल विजयी विरुद्ध भोसला स्कुल , ४) लिटिल एन्जलस्कुल विजयी विरुद्ध भोसला स्कुल
१७ वर्षे मुले : १) सेंट लॉरेन्स स्कुल विजयी विरुद्ध पुरुषोत्तम स्कुल, २) केंद्रीय विद्यालय विजय विरुद्ध जनता विद्यालय, घोटी, ३) टी. जे. चव्हाण स्कुल विजयी विरुद्ध आर. वाय. के., ४) मखलाबाद स्कुल विजयी विरुद्ध केंद्रीय विद्यालय.
५) के. टी एच. एम.विजय विरुद्ध इंग्लिश मिडीयम स्कुल, उंटवाडी ६) पुरुषोत्तम स्कुल विजयी विरुद्ध आर. वाय. के. ७) टी. जे. चव्हाण विजयी विरुद्ध सेंट लॉरेन्स स्कुल.

